उस्मानाबाद -: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतल्यामुळेच महिलांना स्वत:चे हक्क व कर्तव्याची जाणीव झाली तसेच आजही विविध क्षेत्रात महिला खंबीरपणे स्वत:चे अस्तित्व निर्माण करीत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
येथील सांस्कृतिक सभागृह आनंदनगर येथे महिला व बालविकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ,उस्मानाबादच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. या जनजागृती अभियान कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, कृषी सभापती पंडित जोकार यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री चव्हाण यावेळी म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाइ फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेतला नसता तर आजची स्त्री ही पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री व न्यायाधिश या उच्च पदावर विराजमान झाली नसती. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांच्या या महान कार्यामुळे महिलांना स्वत:चा हक्क व कर्तव्याची जाणीव झाली. महिला सर्व क्षेत्रात खंबीरपणे उभे आहेत. सावित्रीबाईं महिलांना शिक्षणाचे धडे देताना समाजाकडून मोठा कडवा विरोध सहन करावा लागला तशाही परिस्थितीत त्यांनी न डगमगता स्त्रीशिक्षणासाठी अहोरात्र कार्य केले.
स्त्रीभृण हत्येमुळे मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस घटत आहे. लग्न समारंभावर होणारा अवाढव्य खर्च टाळण्यासाठी महिला मंडळे व बचतट गटांनी सामुहिक विवाह समारंभ आयोजित करावे त्यास शासन आवश्यक ते सहकार्य करेल असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. व्हट्टे म्हणाले की, सक्षम पिढी निर्मितीसाठी व समाज प्रबोधनासाठी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचे विचार, संदेश गावपातळीवर पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले जाणिव जागृती अभियानाची माहिती दिली.
प्रारंभी पालकमंत्री चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यु. पी. बिरादार यांनी उपस्थित प्रमुख पाहूण्यांचे स्वागत केले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. ए. भादुले यांनी आभार मानले.
माविमच्या सहयोगीनी श्रीमती सत्यशिला शेळके व चांदणी धावारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचे नाट्यसादरीकरण केले. या कार्यक्रमास विविध महिला मंडळांच्या अध्यक्षा, महिला बचत गटाचे अध्यक्षा, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.