नळदुर्ग -: सद्यस्थितीत बेसुमार वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले असून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या आपल्या अवतीभोवती मिळणा-या औषधी वनस्पती ही हळूहळू लोप पावत चाललेल्या आहेत. ही एक चिंतेची बाब असून औषधी वनस्पतीचे जतन आणि संगोपन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कामधेनू सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रसेवादलाचे जिल्हाध्यक्ष बळीराम जेठे यांनी वागदरी (ता. तुळजापूर) येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण जाणीव जागृती कार्यक्रमात बोलताना केले.
वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, बायफ पुणे व जनसेवा बहूउद्देशीय शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित राष्ट्रीय पर्यावरण जाणीव जागृती अभियानांतर्गत जि.प. प्राथमिक शाळा वागदरी येथे आयोजित औषधी वनस्पती विषयी जाणीव जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बळीराम जेठे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मोकाशे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आधार सामाजिक संस्थेचे सचिव दयानंद काळुंके, सरपंच राजकुमार पवार आदीजण उपस्थित होतेञ याप्रसंगी सहशिक्षक विकास कुलकर्णी, गोविंद जाधव, युवराज जाधव आदीनी औषधी वनस्पती, तुळस, कोरपड, सदाफुली, आडुळसा, आवळा, पाणफुटी सह अन्य वनस्पती विषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्रारंभी औषधी वनस्पतीचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दयानंद काळुंके यांनी मनोरंजनातून याविषयी प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनसेवा शिक्षण संस्थेचे सचिव एस.के. गायकवाड यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणपत सुरवसे, संतोष झेंडारे, रामचंद्र बिराजदार, किशोर धुमाळ, सहशिक्षक संजय वाघमारे, चव्हाण सर, लक्ष्मण जाधव, अनिल गोगावे यांच्यासह विद्यार्थी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.