नळदुर्ग -: फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील सक्रिय निष्‍ठावान कार्यकर्ते तथा कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालयातील प्राध्‍यापक शिवाजी बनसोडे यांच्‍या मातोश्री शेवंताबाई गिरजाप्‍पा बनसोडे यांचे वयाच्‍या 85 वर्षी वृध्‍दापकाळाने दुःखद निधन झाले.
    दिवंगत शेवंताबाई बनसोडे ह्या आंबेडकरी चळवळतील जेष्‍ठ महिला कार्यकर्त्‍या होत्‍या. त्‍यांनी धम्‍म चळवळीमध्‍ये महिलांचा सहभाग वाढविण्‍याकरीता सदैव प्रयत्‍नशील होत्‍या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्‍या नामांतर लढयात त्‍यांचा सक्रिय सहभाग होता. नामांतरासाठी निघालेल्‍या मोर्चा आंदोलनामध्‍ये आपला सहभाग वेळोवेळी नोंदवून त्‍यानी चळवळीतील कार्यकर्त्‍यांचे मनोबल वाढविण्‍याचे महत्‍त्‍वाचे कार्य त्‍यानी केले. शैक्षणिक चळवळीत आपला सहभाग नोंदविताना त्‍यानी प्रत्‍यक्ष शाळेत जावून येथील भिमनगर मधील विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक प्रगती विषयी संबंधित मुख्‍याध्‍यापकाकडे चौकशी करत असत. त्‍यांच्‍या पश्‍चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. नळदुर्ग येथे त्‍यांच्‍या मृत देहावर बौध्‍दधम्‍म पध्‍दतीनुसार अंतिम संस्‍कार करण्‍यात आला. यावेळी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, नळदुर्ग महाविद्यालयातील प्राध्‍यापक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वसंत कुमठेकर, आर.एस. गायकवाड, दयानंद काळुंके, मारुती खारवे, रिपाइंचे तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड सह कार्यकर्ते मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top