बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील एका सज्ञान मुलीचे लग्न घरच्या नातेवाईकांनी जमविल्यानंतर ठरलेल्या तारखेप्रमाणे शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम झाला, सर्व वर्‍हाडी गोळा झाले व आज शनिवारी त्यांचा येथील प्रसिध्द असलेल्या मंगल कार्यालयात थाटात विवाह होणार होता. परंतु शनिवारी रात्रीच प्रियकराबरोबर सुत जुळल्याने तिने लग्नाला नकार देत प्रियकराशी विवाह करणार असल्याचे अन्यथा आपल्या जीवाचे बरे वाईट करणार असल्याची धमकी दिली. नवरा मुलाला सदरचा प्रकार कळाल्यानंतर रातोरात त्यानी आपल्या सोबत आणलेले नातेवाईक व आप्तेष्ठांना घेऊन घर गाठले. आज ठरलेल्या मंडपात प्रियकराशी लग्न लावण्याचा नाईलाज झाल्याने नातेवाईकांनी तिचा विवाह तिच्या प्रियकराशी लावला.

 
Top