नळदुर्ग -: चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन लक्ष्‍मण रंगराव गायकवाड यांच्‍या विरोधात दाखल करण्‍यात आलेल्‍या अविश्‍वास ठराव सहाय्यक निबंधक तुळजापूर यांनी फेटाळल्‍यामुळे पुन्‍हा कॉंग्रेसचे लक्ष्‍मण गायकवाड हेच चेअरमनपदी कायम राहिले आहेत.
        चिकुंद्रा विकास सोसायटीच्‍या १३ जागेसाठी डिसेंबर २०११ मध्‍ये पार पडलेल्‍या निवडणुकीत लक्ष्‍मण गायकवाड समर्थक शेतकरी विकास पॅनलने ११ जागा जिंकल्‍या होत्‍या. मात्र काही महिन्‍यानंतर मतभेद निर्माण झाल्‍यामुळे सत्‍ताधारी पॅनलमधील काही सदस्‍यांनी डिसेंबर २०१२ मध्‍ये गायकवाड यांच्‍या विरोधात अविश्‍वास ठराव संमत केला होता. यावर दि. २ जानेवारी २०१३ रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था तुळजापूर यांच्‍या समक्ष ठरावाद्वारे बहुमत सिध्‍द करण्‍याची निर्णय प्रक्रिया पूर्ण करण्‍यात आली. दरम्‍यान गायकवाड यांच्‍या विरोधातील एक तृतीअंश बहुमत सिध्‍द न झाल्‍यामुळे व ऐनवेळी गायकवाड यांच्‍या बाजूने काही सदस्‍याने पाठिंबा दर्शविला. यामुळे स्‍पष्‍ट बहुमताचे अभावी निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस. कुलकर्णी यांनी अविश्‍वास ठराव फेटाळला व लक्ष्‍मण गायकवाड यांचे चेअरमनपद पुनःश्‍च कायम ठेवत. त्‍यांची फेरनिवड निर्णय अधिकारी एस.एस. कुलकर्णी, सचिव शेषेराव वाघमारे यांनी काम पाहिले. या निवडीबद्दल गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
Top