नळदुर्ग :- या अर्थाने शाळा हे समाज परिवर्तनाचे माध्‍यम असून शाळांमधून रस्‍ता सुरक्षा विषयक संदेश पोहचविल्‍यास व्‍यक्‍तीगत सुरक्षेबरोबर इतरांची सुरक्षा होण्‍यास मोठी मदत होईल, असे मत वाहतुक नियंत्रण नळदुर्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक उत्‍तरेश्‍वर ए. बारकुल यांनी व्‍यक्‍त केला.
         वाहतूक नियंत्रण शाखा नळदुर्ग, श्री भैरवनाथ विद्यालय चिकुंद्रा व ज्ञानकिरण सामाजिक संस्‍था अणदूरच्‍यावतीने चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे रस्‍ता सुरक्षा सप्‍ताह व पोलीस वर्धापन दिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष यशवंत गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे म्‍हणून नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख, सरपंच राजेंद्र गरड, सोसायटीचे चेअरमन लक्ष्‍मण गायकवाड, परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारुती बनसोडे, आधार संस्‍थेचे दयानंद काळुंके, मुख्‍याध्‍यापक पी.एस. पवार हे होते. प्रारंभ श्री भैरवनाथ माध्‍यमिक विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी रस्‍ता सुरक्षेसंबंधी घोषणा देत गावातून संदेश फेरी काढली. या संदेश फेरीचे फित कापून उदघाटन यशवंत गायकवाड, उत्‍तरेश्‍वर ए. बालकुल, केंद्रप्रमुख कानडे राजेंद्र, पोहेकॉ ए.के. वाघे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
           यावेळी घेण्‍यात आलेल्‍या प्रबोधनपर कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांनी विद्यार्थ्‍यांनी एक सामाजिक बांधलिकी म्‍हणून सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा व नियमांची माहिती जिज्ञासुवृत्‍तीने करुन घ्‍यावी. कारण विद्यार्थी हे देशाचे भवितव्‍य घडवू शकतात, असे त्‍यांनी सांगितले. शिवाय रस्‍ता सुरक्षा याबाबत विद्यार्थ्‍यांसह पालकांनीही जागृत राहिल्‍यास अपघाताचे अनर्थ टळतील असे मारूती बनसोडे यांनी सांगितले. याप्रसंगी रस्‍ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम या संबंधी पोस्‍टर प्रदर्शन भरविण्‍यात आले होते. यावेळी सहाय्यक फौजदार डी.पी. इरपतगिरे, पोलीस नाईक बाबासाहेब मोराळे, पोकॉ. के.एस. शेख, संजय पवार, विजय राठोड, गणेश बलसुरे, प्रशांत जवळगावकर, पत्रकार विलास गायकवाड यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन ज्ञानकिरण संस्‍थेचे अध्‍यक्ष भैरवनाथ कानडे यांनी केले. तर महादेव गरड आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पोलीस कर्मचारी व ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top