सोलापूर :- सामुदायिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणा-या अनुसुचित जाती तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दांपत्यांसाठी कन्यादान योजना सामाजिक न्याय व विशेष सहारूय विभागांतर्गत कार्यान्वित असून या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते.
अनुसुचित जाती किंवा विमुक्त जाती-भटक्या जमातीच्या दांपत्यास रुपये दहा हजारची रक्कम आणि सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणा-या स्वयंसेवी संस्थांना प्रति पात्र जोडपे रु. दोन हजार प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते.
तरी सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणा-या अनुसुचित जाती तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दांपत्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आणि सामुहिक विवाह सोहळा आयोतजत करणा-या स्वयंसेवी संस्थांनी वरील याजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानासाठी परिपूर्ण प्रस्ताव जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात दाखल करावेत असे आवाहन समाज कल्याण आयुक्तांनी केले आहे.
सदर प्रकरणी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सातरस्ता, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा.