सोलापूर : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी. एस. जोशी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे आणि मधमाशी पालन प्रकल्पाचे संचालक श्री. जगताप उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना मुळीक म्हणाले की, कोणताही उद्योग हा लहान किंवा मोठ्या स्वरुपाचा नसतो. उद्योजकांनी त्या उद्योगाला आपल्या मेहनतीने मोठे स्वरुप द्यावे लागते. शासनाच्या चांगल्या योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील उद्योजकांच्या विपणन आणि विक्रीच्या अडचणी सोडविण्याच्या हेतुने ठेवण्यात आलेले हे प्रदर्शन निश्चितच ग्रामीण उद्योजकांना फायद्याचे ठरेल. ग्रामीण भागातील उद्योजकांना विपणन क्षेत्रातील उच्च संधी उपलब्ध होण्यासाठी अशा प्रकारची प्रदर्शने वारंवार भरविल्या जावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण व शहरी उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या मालाची विक्री व प्रसिध्दी होण्यासाठी दि. 18 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात 15 विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. कार्यक्रमास अनेक उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते.