सोलापूर -: सोलापूर 9 महाराष्ट्र बटालीयन एन सी सीच्या वतीने दिनांक 17 जानेवारी 2013 रोजी सकाळी 10.30 वा. हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे, वीरपत्नी / वीरमाता / वीरपिता व शैर्यपदक धारकांचा गौरव करण्यात येणार आहे. सदर मेळाव्यास ग्रुप कमांडर एन सी सी ग्रुप, पुणे ब्रिगेडीयर नरेशकुमार आणि कर्नल सुहास जतकर, संचालक सैनिक कल्याण विभाग, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहुन मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरपत्नी / वीरमाता / वीरपिता व शैर्यपदक धारक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी  केले आहे.
 
Top