उस्मानाबाद -: येथील मत्स्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सु . ज.पाटील यांचे 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या मागे चार भाऊ,पत्नी,एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.
पाटील हे मुळचे देगाव, वाळुज, ता.मोहोळ,जि. सोलापूर येथील रहिवासी होते. त्यांचे वडिल हे स्वातंत्र्य सैनिक होते. पाटील हे 1979 पासून या विभागात कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी सहायक आयुक्त म्हणून पुणे व ठाणे येथेही जबाबदारी पार पाडली होती. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ते अधिकारी व कर्मचारी यांच्यात परिचित होते.
पाटील यांच्या पार्थिवावर देगाव या त्यांच्या मुळ गावी शुक्रवार दि. 4 जानेवारी रोजी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले.