बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : रोटरी क्लब, रोटरी कम्युनिटी कॉपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बावी (ता. बार्शी) येथे घेण्यात आलेल्या मोफत भिंगारोपण व नेत्र तपासणी शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या शिबीराचे आयोजन केले होते. यात सुमारे 100 पेक्षा जास्त गरजू स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला.
    यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय गुंदेचा (खांडवीकर), मेजर पोकळे, सतिश जाजू, सरपंच गजेंद्र काकडे, शिवाजी पवार, संदिप आगलावे, गणेश झाडे आदि उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना पवार म्हणाले आपण समाजाचे घटक आहोत व आपली सामाजिक बांधीलकी सातत्याने जपत ग्रामीण भगातील लोकांशी जवळीक साधणार्‍या समाजसेवकांना उपजत बुध्दी आहे. गुंदेचा यांनी बोलतांना ग्रामीण परिसराचाही सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. जनतेच्या सहभागातून अनेक लोकोपयोगी उपक्रम करण्याच्या योजना असून माती परीक्षण, पीक पध्दती, पाणी पुरवठा इ. शेतकर्‍यांसाठी महत्वाच्या प्रश्‍नांनाही यात महत्व दिले आहे.
 
Top