उस्मानाबाद -: पत्रकारितेच्या माध्यमातून शासन तसेच समाजातील सकारात्मक बाजूंना प्रसिध्दी देवून त्यांना बळ दयावे तसेच व्यवस्थेतील उणीवा दूर करण्यासाठी महत्वाची भूमिका प्रसारमाध्यमांनी बजवावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. केशव सांगळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, संघाचे सचिव संतोष जाधव, प्रांत प्रतिनिधी राजाभाऊ वैद्य यांची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी हरिदास आणि उपस्थितांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी हरिदास म्हणाले की, शासनाचा घटक म्हणून काम करताना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात.अशावेळी काही जण नाराज होण्याची शक्यता असते. त्यातुन नकारात्मक बातम्या येण्याची शक्यता असते. प्रसारमाध्यमांनी त्या निर्णयांमागची वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि त्यातून योग्य बाजू समाजासमोर आणावी असे आवाहन केले. शासनाचे अनेक उपक्रम प्रसारमाध्यमांच्या सहकार्यामुळेच यशस्वी ठरले आहेत. प्रसार माध्यमांचा हाच सकारात्मक दृष्टीकोन शासन व्यवस्थेत काम करताना बळ देतो, असे त्यांनी नमूद केले.
चव्हाण यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार व दैनिक संघर्षचे संपादक व्यंकटेश हंबीरे यांनी, जिल्ह्यातील पत्रकारांनी नेहमीच सकारात्मक व विकासाभिमुख पत्रकारीता केल्याचे सांगितले. पत्रकार संघाच्या माध्यमातून विकासासाठी एक गाव दत्तक घेतले जाईल,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
सचिव संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले तर वैद्य यांनी सूत्रसंचलन केले तसेच आभार मानले. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे सदस्य, शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी हजर होते.