बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -:          सोलापूर जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी बार्शी तालुक्‍याला भेट‍ दिली. या भेटीदरम्‍यान बार्शी प्रेस क्‍लबच्‍यावतीने डॉ. माळी यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
    बार्शी तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र व निवासी आश्रमशाळा यांची डॉ. माळी यांनी पाहणी केली. यादरम्‍यान एका कार्यक्रमात बार्शी प्रेस क्‍लबच्‍यावतीने त्‍यांचा जाहीर करण्‍यात आला. यावेळी बोलताना त्‍या म्‍हणाल्‍या, तीन पायांवर असलेल्‍या टेबलला जोपर्यंत चौथा पाय लावला जात नाही तोपर्यंत तो डगमगत राहतो. त्‍याच पध्‍दतीने लोकशाहीतील टेबलचा चौथा महत्‍त्‍वाचा खांब म्‍हणून पत्रकार काम करतात. त्‍यांचा कोणत्‍याही राजकारणाशी अथवा कोणत्‍याही प्रकाराशी थेट संबंध नसतो. लोकशाहीत जर बिघाड झाला तर पत्रकारच चांगल्‍याप्रकारे त्‍या गोष्‍टीला सुरळीत करतात. पत्रकारांच्‍या लेखनामधील सामर्थ्‍य यापुढच्‍या काळातही बहरत जावे, तसेच सामाजिक योगदानातही माध्‍यमांचा असलेला वाटा कौतुकास्‍पद आहे, असेही डॉ. माळी म्‍हणाल्‍या.
    या सत्‍कारास बार्शी प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष सचिन वायकुळे, मुख्‍याध्‍यापक अशोक मुंडे, खजिनदार संजय बारबोले, सहसचिव मल्लिनाथ धारुरकर, सहशिक्षक सचिन उकिरडे, अनील देशपांडे, प्रशांत आवटे, सुदर्शन हांडे, विनोद ननवरे मनोज हंप्रस, गोरख यादव यांच्‍यासह आदी मान्‍यवर उपस्थित होते.
 
Top