बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्‍ट्र नवनिर्माण राज्‍य परिवहन कामगार सेनेच्‍या मुंबई येथील मोर्चासाठी राज्‍यभरातून मोठ्या प्रमाणात कर्मचारी गेले आहेत. त्‍याचा फटका परिवहनला बसला असून दोन दिवस संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे.
    बार्शी आगारातील चालक-वाहक व कार्यशाळा सहाय्यक आदी 579 पैकी सुमारे 225 कर्मचारी गैरहजर असल्‍याने दररोज सुमारे दीड लाखाचे नुकसान होत आहे. दैनंदिन फायद्यात असलेल्‍या फे-या नियमित चालू ठेवण्‍याचा प्रयत्‍न बार्शी आगाराने केला असून वरिष्‍ठ पातळीवरुन आदेश येईल, त्‍याप्रमाणे आपण कामकाज सुरु ठेवत असल्‍याचे तसेच सदरच्‍या मोर्चास कमी संख्‍येने जावे व प्रवाशांनी संयम राखावा, असे आवाहन देखील केल्‍याची माहिती बार्शी आगार व्‍यवस्‍थापक प्रशांत वासकर यांनी दिली.
 
Top