सोलापूर :-  टंचाई परिस्थितीमध्ये मजुरांना रोजगार, जनावरांना चारा, पाणी टंचाई तसेच पिण्याचा पाणी पुरवठा याबाबतच्या अडी-अडीचणींच्या सोडवणुकीच्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना सर्व विभागप्रमुखंना देण्यात आलेल्या आहेत. टंचाई निवारणामध्ये क्षेत्रीयस्तरावरील अधिका-यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यास सर्व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथील माझ्या संपर्क कार्यालय इंदिरा गांधी स्टेडीयम (पार्क स्टेडीयम), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर (दु. क्र. ०२१७-२३२९५७९) येथे सोमवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत पालकमंत्र्यांना समक्ष भेटावे. ज्यांना समक्ष भेटणे शक्य होणार नाही अशा नागरिकांनी त्यांची लेखी निवेदने दोन प्रतीत संपर्क कार्यालयात पाठवावीत. असे आवाहन पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले आहे.

 
Top