उस्मानाबाद -: जिल्हयात यंदा अपूरा पाऊस अवेळी पाऊस झाल्याने पिकांची वाढ झाली नाही, पडीक जमिनीवर चारा उगवन कमी झाल्याने जिल्ह्यात उपलब्ध जनावरांना चारा टंचाई जाणवत आहे.भूम तालुक्यात दोन छावण्या सुरु असून अशा परिस्थितीत  जनावर व  पशुधनासाठीचे चारा साठवणूक करणे, चारा जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी प्रतिबंध केला आहे.
    गुरांसाठी कापून वाळवून ठेवलेले गवत, भूसा,कडबा,गवत,सुकलेला ऊस या सर्व प्रकारचा जनावरांचा चारा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होईपर्यंत व त्या पावसावर समाधानकारक चारा उपलब्ध होईपयंत सक्षम अधिकारी यांचे परवानगी शिवाय वाहतूक करण्यास बंदी आहे.
    जिल्हयाबाहेर चारा वाहतूकीसाठी वापरण्यात येत असलेली वाहने, तसेच वाहतूक करणाच्या विचाराने साठवणूक केलेला जनावरांचा चारा तपासण्याचे व अटकावून ठेवण्याचे अधिकार त्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे.
    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उस्मानाबाद, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,  जिल्हा परिषद,उस्मानाबाद, सर्व पोलीस निरीक्षक/ उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी  व त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या सर्व अधिकारी, सर्व वनक्षेत्रपाल व त्यापेक्षा वरच्या दर्जाचे अधिकारी, सर्व नायब तहसीलदार महसूल व त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकारी,सर्व पुरवठा निरीक्षक व सर्व मंडळाधिकारी यांना आहेत.
    गरजेप्रमाणे जनावरांना चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यासाठी मागणीनुसार रीतसर परवाना दि महाराष्ट्र कॅटल फॉडर( ट्रान्सपोर्ट कंट्रोल) ऑर्डर 1985 च्या परिशिष्ट (2) मधील नमुन्यात देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद व भूम यांना त्यांचे कार्यक्षेत्रात प्रदान करण्यात आले आहेत. त्यांनी वाहतूकीचा उददेश तपासून शासन निर्णयाप्रमाणे उक्त ऑर्डरच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करावी,असे आदेशित करण्यात आले आहे.

 
Top