![]() |
निशिगंधा माळी |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सौ.निशीगंधा माळी यांच्या बार्शी दौ-याची अगोदरच चाहूल लागल्याने सर्व काही अलबेल असल्याचे चित्र दिसले.
बार्शी शहराच्या जवळ असलेल्या आगळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखर्डे आरोग्य केंद्रात सर्व ठिकाणी स्वच्छता, टापटिप असल्याचे चित्र दिसले. कुठेही काही चुकीचे दिसून आले नाही. सर्व कर्मचारी तत्परतेने जागेवर उपलब्ध होते. जवळच असलेल्या आगळगावच्या आश्रमशाळेत देखील पटसंख्या परिपूर्ण होती. विद्यार्थी पोपटासारखे बोलत होते. मॅडम यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पटापट देत होती. शाळेच्या पाठीमागे लगत असलेल्या शौचालय व स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याने त्या ठिकाणी थोडावेळही थांबणे असह्य होत होते. शौचालयाच्या बाहेर काढलेल्या आऊटलेटला मोकळ्या मैदानात सोडून दिल्याने त्या ठिकाणी प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेे होते व वातावरणात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. वर्गाच्या शेजारीच एका पेटीमध्ये ससे पालन केल्याचे दिसून आले. गोडाऊनमध्ये धान्य साठविले होते. वर्ग खोल्या चांगल्याप्रकारे सजविण्यात आल्या होत्या. शिक्षकदेखील वेळेवर हजर होते. परंतु आरोग्याच्या बाबत उदासनि धोरण दिसून आल्याने मुळातच डॉक्टर असलेल्या मॅडम यावर कोणत्या प्रकारची कारवाई करतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सदरच्या संस्थेत मॅडम आल्याचे कळताच संस्थेच्या पदाधिका-यांचे फोन खणखणू लागले व एका कार्यकर्त्याने तात्काळ फोन मॅडमकडे देत सर आपल्याशी बोलायचे म्हणतात, असे सांगितले. मॅडमबरोबर काय झाली, हे कळाले नसले तरी काय बोलले असतील याचा अंदाज वाचकांना आला असेलच. आश्रमशाळेचा अपवाद वगळता माळी मॅडमचा दौरा सर्व काही अलबेल आहे असाच होता.