उस्मानाबाद -: पाणी टंचाईचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी पाणी असलेल्या विंधन विहीरींची दुरुस्ती तातडीने घ्या, आवश्यक तेथे टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा आणि तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना गतीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले.राज्य शासन पाणीटंचाई उपाय योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चव्हाण यांनी आजपासून पाणीटंचाई संदर्भात तालुकानिहाय बैठका घेवून आढावा घेण्यास प्रारंभ केला. आज उमरगा आणि लोहारा येथे तालुकास्तरीय बैठका घेवून त्यांनी पाणीटंचाई व त्यावरील उपाय योजनांची स्थिती जाणून घेतली. उमरगा येथील बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले. खासदार डॉ. पदमसिं पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे,आमदार ज्ञानराज चौगुले, आ. बसवराज पाटील, पंचायत समिती सभापती अक्षरताई सोनवणे व उपसभापती बाबा काझी, नगराध्यक्ष श्री.खरोसेकर यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास आदिंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी उमरगा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेतला. तुरोरी, कोळसुर, कदेर, माडज,कवठा,गुंजोटी,जेवळी आदि गावांना सध्या पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे अशा तक्रारी तेथील ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्यांनी केल्या. त्यावर पालकमंत्री चव्हाण यांनी त्या गावच्या ग्रामसेवक तसेच गट विकास अधिकारी आणि तहसीलदारांकडून पाणी पुरवठ्यासंदर्भातील स्थिती जाणून घेतली.
उमरगा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेची कामे आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ सुरु करा.टंचाई परिस्थिती असणाऱ्या भागात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देवून तातडीने आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात,असे त्यांनी सांगितले.
भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल योजनेत अपूर्ण राहिलेल्या कामांची कारणे शोधून या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हरिदास यांना दिले.
डॉ.व्हट्टे यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात असल्याचे सांगितले. खासदार डॉ. पाटील यांनी पाणीटंचाईचा सामना एकत्रितपणे करावा. शासन पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द आहे,असे सांगितले. तर आमदार पाटील यांनी ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असून पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.आ. चौगुले यांनी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर हेात असून त्यांच्या तसेच वन्य क्षेत्रातील प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी केली. तसेच तालुक्यात साखर कारखाने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत चारा छावण्या सुरु कराव्यात,असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी पाण्याच्या अतिवापर आणि अतिउपसामुळे आपण पाणी गमावत असल्याचे सांगितले. सर्वांनी पाणी काटकसरीने वापरावे. याचबरोबर ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत तेथील विहीर अथवा तलावातील गाळ काढण्याची मोहिम राबवावी,विंधन विहीरी दुरुस्त कराव्यात असे आवाहन केले. याबाबत नागरीकांनी स्वताहून पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.