बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील महावीर जैन गोशालेचे स्थलांतर साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी 48 गायींची पूजा करण्यात आली.
यावेळी बोलतांना प्रदिप बागमार यांनी म्हटले गोशाळेचा उद्देश हा त्यातून उत्पादन घेण्यासाठी नाही. जैन धर्मातील अहिंसा शिकवणीनुसार मुक्या प्राण्यांना अभय देण्यासाठी तसेच त्यांचे चांगले पालन पोषण करण्यासाठी करण्यात आले आहे.
यावेळी साध्वी अर्चित गुणाश्रीजी म्हणाल्या वैदिक धर्मानुसार जन्मदात्री आई, दायी, राजाची पत्नी, गुरुची पत्नी, ब्राम्हण इत्यादिंची पत्नी, पृथ्वी या 6 प्रकारच्या माता असतात. शेतीमध्ये धान्य उत्पादनासाठी बैल त्याचप्रमाणे आईसारखे पवित्र दूध देणारी गाय याची आपल्याला अत्यंत आवश्यकता असते. गाय, बैल यांना वाचविणे हे आपले परम कर्तव्य असून पूरातन काळापासून याबाबत सतर्कता ठेवण्यात आली आहे. जैन समाज बांधवांनी आपल्या पॉकेट खर्चातील रक्कम गोरक्षणासाठी वापरावी.
यावेळी साध्वी सुयशाजी, ओमप्रकाश बामणा यांनीही विचार मांडले, जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.