बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील भवानी पेठ, मांगडे चाळ व सोलापूर रोड या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या.
शिवसेनेच्या भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीत ग्रामीण भागातील शाखा होत असून रविवारी भवानी पेठ, मांगडे चाळ, सोलापूर रोड या भागात शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर पवार, काका गायकवाड, दिपक आंधळकर, शाखाप्रमुख उमेश जाधव, बाबासाहेब कापसे, आबा सोनवणे, कृष्णा चव्हाण, अरिम शेख, संतोष शेट्टी, रवि गायकवाड, चंद्रकांत वडेकर, ऍड.शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना भाऊसाहेब आंधळकर यांनी म्हटले, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र झटण्यास तयार असून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्यासाठीच शिवसेना आहे. कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. परिवर्तन हे अटळ आहे. आपणाला गुलामगिरी संपवायची आहे. शिवसेनेचा धसका घेतलेल्या विरोधकांनी अफवा सोडण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी आपल्या अडचणी न घाबरता सांगाव्यात शिवसेनेच्या वतीने त्या सोडविल्या जातील. यावेळी दिपक आंधळकर, बाबासाहेब कापसे, काका गायकवाड यांनी मनोगते मांडली.