ग्राम विकास विभागातर्फे वांद्रे रेक्लमेशन येथील म्हाडाच्या मैदानावर दि. १९ जानेवारी ते ३ फेब्रवारी २०१३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले ‘महालक्ष्मी सरस’ हे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच देशातील ग्रामीण कारागिरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री असलेले प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाची सुरुवात १० वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्यावेळी लावलेल्या या प्रदर्शनरुपी रोपटयाचे विशाल अशा वटवृक्षात रुपांतर झाले असून मुंबईकर व आसपासच्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र आणि भारत एकत्रित पाहण्याची मोठी संधी आहे.
नुकतेच या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना, महालक्ष्मी सरस म्हणजे राज्यातील महिला स्वयंसहाय्यता अल्पबचत गट, तसेच राज्य व राज्याबाहेरील ग्रामिण कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारे प्रदर्शन आहे. त्यास मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भरभरुन प्रतिसाद, द्यावा असे आवाहन केले.
जिजाऊ, रमाई, अहिल्या आणि सावित्रीबाई फुले अशी चार भव्य दिव्य दालने या ठिकाणी उभारली असून यात ५८४ स्टॉलची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. या स्टॉल मधून मीठ, मिरची, मोहरी, ते विविध प्रकारची वस्त्रे, खाद्य पदार्थांची रेलचेल अशा सर्व प्रकारच्या वस्तूंचे दर्शन आपणास घडते आणि राज्यपाल महोदयांच्या वक्तव्याची यथा योग्य खात्री पटते. आपल्या देशाच्या ग्रामीण भागातील हे कारागिर आपल्या वस्तूंची निर्मिती अत्यंत कुशलतेने करतात. केवळ त्यांना योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने काहीशी माघार घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या श्रमाचे पुरेसे मोल त्यांना मिळू शकत नाही. म्हणूनच त्यांच्या या कलाकृतींना वस्तूंना आपण मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद देणे अत्यंत गरजेचे आहे.
महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाच्या www.mahalaxmisaras.org या संकेतस्थळाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले असून या संकेतस्थळावर या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची नावे, त्यांची उत्पादने व फोन नंबर उपलब्ध आहेत.
या संकेतस्थळांमुळे हे प्रदर्शन संपल्यानंतरही या विक्रेत्यांची उत्पादने ग्राहकांना मिळू शकणार आहेत. प्रदर्शनात फिरताना तुम्हाला आमच्या जालना जिल्ह्यातील महिला घोंगडी विणताना दिसेल तर घोंगडीपासून असलेले फायदे दर्शविणारा बोर्ड व ३०० रुपयांपासून ३ हजार व त्यापुढे असलेल्या घोंगड्या पाहावयास मिळतात. अगदी गावरान मूग, मटकी पासून ते थेट गूळ व काकवी आदी पदार्थ मिळतात. त्यासोबत विविध प्रकारची खेळणी, महिलांसाठी साडयांचे स्टॉल तर उत्तमात उत्तम असे रेशीम, टसर सिल्कचे झब्बे देखील या ठिकाणी आहेत. मुंबईकर खवय्यांसाठी जवळपास ८० खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील या प्रदर्शनात आहेत. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रमही याठिकाणी होतात.
थोडक्यात सांगावयाचे झाल्यास सर्वस्तरातील आबालवृध्दांसाठी असलेले हे प्रदर्शन आहे. सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत अगदी मोफत हे प्रदर्शन आहे. त्यामुळे मुंबईकरानी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण कारागिरांची पाठ थोपटण्यास काहीच हरकत नाही.
* राजू पाटोदकर
patodkar@yahoo.co.in