बार्शी :-  मागील भांडणाचा राग मनात झालेल्या भांडणात बरगडीत कुकरी व लोखंडी टॉफीने मारहाण झाल्याने एकाला गंभीर दुखापत झाली आहे. येथील डॉ. बकरे यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यावर त्यास तातडीने सोलापूर येथे उपचारासाठी हलिवण्यास सांगीतले. यानंतर जखमीना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवार दि. 8 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
       मंळवार दि. 8 रोजी दुपारी 12 च्या सुमारास गोविंद बबन गडदे व बालाजी भगवान गडदे रा.जामगांव ता. बार्शी हे दोघे भोसले चौकात आल्यावर त्यांच्यावर कुकरीने हल्ला करण्यात आला. यातील गोविंद हा गंभीर जखमी आहे. सोमवार ता. 7 रोजी जामगांव येथील रिलायन्स प्लान्टच्या जवळ असलेल्या गडदे यांच्या कॅन्टीनवर यातील आरोपी नागेशचे सिगारेटच्या कारणावरुन भांडण झाले होते व नागेश याला थोबाडीत मारण्यात आली होती.
     घटनेनंतर शंकर अरुण भिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नागेश रामलिंग गाढवे (वय 22 रा.आझाद चौक), रुपेश गलांडे (वय 22), अभिजीत बाबासाहेब कारंडे (वय 21), भगवान पवार (वय 22) चंद्रकांत जाधव, कृष्णा रजपूत, नितीन गायकवाड व इतर 2 ते 3 जणांवर गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून उर्वरीत आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. सदरच्या घटनेचा तपास गजेंद्र मनसावाले हे करित आहेत.
 
Top