बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुविद्या स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे सुलाखे हायस्कूलची खेळाडू सृष्टी दसंगे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
     नागपूर येथे राज्यस्तरीय शालेय धनुविद्या स्पर्धेत सुलाखे हायस्कूलची खेळाडू सृष्टी दसंगे हिने 14 वर्षेवयोगटात 30 मीटर रेंज प्रकारात िद्वतीय क्रमांक पटकावला. िद 22 ते 25 जानेवारी दरम्यान कलकत्‍ता येथे होणार्‍या शालेय राष्ट्रीय पातळीवरील धनुविद्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
     या यशाबद्दल मुख्याध्यापक आण्णासाहेब पाटकुलकर यांच्या हस्ते दसंगे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक प्रमोद माळी, समीर वायकुळे, सुहास शिंदे, संतोष पवार, रामचंद्र इकारे, कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top