सोलापूर :- सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्यक्रीडा व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसुचित जाती नवबौध्द घटकातील भुमिहीन शेतमजुरांना बागायत 2 एकर व जिराईत 4 जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी खाजगी व्यक्तिमार्फत जमीन खरेदी करुन संबंधितांना देण्यात येणार असून जमीन विक्री करण्यास तयार असणा-या व्यक्तींनी खालील अटींवर जमीन विक्री करावी. जमिनीवर इतर कोणताही मालकी हक्क नसावा, सदर जमिनीवर कोणत्याही आर्थिक संस्थेचा बोजा किंवा संस्थेला तारण नसावी, सर्च रिपोर्ट सादर करावा, जमीन कसण्यासारखी असावी, 7/12  उता-यावर च खाते उतारावर विक्री करणा-याचेच नांव असावे, इतर व्यक्तींच्या नांवे मुख्त्यारपत्र नसावे, शासन दराने खरेदीबाबत कायदेशीर संमतीपत्र द्यावे लागेल, स्टॅम्प ड्युटी बाबत निर्णय नंतर घेण्यात येईल, जमीन न्यायप्रविष्ट नसलेबाबत संबंधित मालकाचे संमतिपत्र, सदरची जमीन शासनाकडून मोफत मिळासली नसलेबाबत जमीन मालकाचे संमतीपत्र आवश्यक आहे.
    तरी जमीन विक्री करणा-या व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सात रस्ता, सोलापूर याकठिण कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
 
Top