सांगोला (राजेंद्र यादव) : विश्वकल्याण वैदिक सेवा मंडळ सांगोला यांच्यावतीने सांगोला येथील माळवाडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अग्निष्टोम सोमयागाला भक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात सुरवात झाली हा यज्ञ सहा दिवस चालणार आहे. पहिल्यांदाच सांगोल्यात होत असलेला हा सोमयाग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील शिवपूरी येथे व बार्शी तालुक्यात हा यज्ञ गेल्या कांही वर्षांपूर्वी झाला होता. आठ वर्षानंतर असा हा यज्ञ सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथे होत असल्याचे संयोजकांनी सांगितले. बुधवारी सकाळी सोमयाग सुरू करण्यापूर्वी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या यज्ञासाठी गोव्यातील 40 ब्राह्मण आले आहेत. अचल आपटे (वायपेय पुरोहित) यांच्यासह इतर घनपाठी ब्राह्मण यात सहभागी झाले आहेत. गुरूवारी सकाळी अर्णी व मंथा यांच्या सहाय्याने अग्नी तयार करण्यात आला. हा अग्नी केवळ 4 ते 5 मिनिटांत तयार झाला. यासंदर्भात अचल आपटे म्हणाले की, ''असा अग्नि तयार झाल्याशिवाय इतर विधी सुरू करता येत नाहीत. कांहीठिकाणी असा अग्नी तयार व्हायला तीन तास ते तीन दिवसही लागले आहेत.'' हा विधी पाहण्यासाठी सांगोला परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
निसर्गातील वाढते प्रदूषण कमी व्हावे, रोगराई कमी व्हावी, भूकंप, वादळ व इतर नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण व्हावे यासाठी असे यज्ञ केले जातात. या यज्ञाचा फायदा जवळपासच्या 150 कि.मी. परिसराला होणार आहे. दि. 21 रोजी सुरू झालेला हा सोमयाग दि. 26 पर्यंत चालणार आहे. तेव्हा नागरिकांनी या सोमयागास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.