तुळजापूर -: एका शेतक-याच्‍या घरास आग लागून भांडे, कपडे, लत्‍ते, धान्‍य यासह संसार उपयोगी साहित्‍य आणि पाचशे कडबा जळून खाक झाल्‍याची घटना होर्टी (ता.तुळजापूर) येथे बुधवार दि. 20 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजण्‍याच्‍या दरम्‍यान घडली.
    तुळजापूर तालुक्‍यातील होर्टी गावातील आयुवेर्दीक दवाखान्‍याजवळ महादेव सदाशिव भोसले या शेतक-याचे घर असून बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता अचानक आग लागली. या आगीच्‍या दुर्घटनेत कुळव, नांगर, डुबे, कोळपे असे शेतीची अवजारे तर पाचशे कडबा, भांडे, कपडे, दोन पोते ज्‍वारी, तीन पोते गहू असे जळून भस्‍मसात झाले. या आगीच्‍या दुर्घटनेमध्‍ये तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्‍याचे महादेव भोसले यांनी बोलताना सांगितले. ही घटना समजताच मुर्टा येथील युवा कार्यकर्ते गोपाळ सुरवसे, पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांचे नातू अभिजीत चव्‍हाण  यांनी भेट देऊन शेतक-याचे सांत्‍वन केले. या घटनेचा पंचनामा तलाठी कांबळे यांनी केले आहे. या घटनेमुळे महादेव भोसले या शेतक-याचे संसार उघड्यावर पडले असून शासनाने त्‍वरीत आपतकालीन म्‍हणून मदत करण्‍याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
 
Top