सांगोला (राजेंद्र यादव) -: लोकप्रतिनिधींच्या बैठकीत अस्तरीकरणाच्या मुद्यावर योग्य तो तोडगा न निघाल्यामुळे व चिकमहुद, महुद बुद्रूक येथील शेतकर्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी तसेच अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी चिकमहुद, महुद बुद्रूक, खिलारवाडी, गायगव्हाण या चार गावातील शेतकर्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. बंदमुळे गाव व बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने शुकशुकाट होता. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नीरा उजवा कालवा क्र. 2 मध्ये अस्तरीकरणाच्या मुद्दयावरून शासन व शेतकरी यांच्यात दोन वर्षापासुन वाद सुरू आहे. दरम्यान, रविवारी नीरा उजवा कालवा क्र. 3 मधील कि.मी. 1 ते 10 मध्ये अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती लाभधारक शेतकर्यांना मिळाल्यानंतर शेतकर्यांच्या जमावाने याठिकाणी अस्तरीकरण करू नका, असा मज्जाव केल्यामुळे ठेकेदारांनी पोलिसांत शेतकर्यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी शंभर ते सव्वाशे शेतकर्यांवर गुन्हे दाखल केले होते. शिवाय लोकप्रतिनिधी अस्तरीकरणाच्या मुद्दयावर स्पष्ट भूमिका मांडत नाहीत व आमच्याशी चर्चाही करत नाहीत, असे गर्हाणी शेतकर्यांनी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यापुढे काल मंगळवारी मांडली होती.
या पार्श्वभूमीवर आ. गणपतराव देशमुख, आ. दीपक साळुंखे-पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भोई, पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी चिकमहुद, महुद बु, खिलारवाडी, गायगव्हाण याभागातील लाभधारक शेतकर्यांची संयुक्त बैठक सांगोला सुतगिरणीवर मंगळवारी आयोजित केली होती. या बैठकीत मारूती ढाळे, बाळासाहेब सराटे, सुरेश कदम, नवनाथ भोसले, कालिदास भोसले आदि शेतकर्यांनी एकाच वेळी किमी 114(माळशिरस) व कि.मी. 150 ते 169 (सांगोला) तालुक्यात अस्तरीकरण करण्यासाठी आमची हरकत नाही असा आग्रह धरून न्यायालयाचा आदेश सांगोला तालुक्यापुरता र्मयादित आहे का? तो माळशिरस तालुक्यास लागु होत नाही का? आमचा अस्तरीकरणाला विरोध नसून समान पाणी वाटप कायद्यानुसार आम्हाला पाणी मिळावे ही आमची मागणी आहे. लोकशाही मार्गाने आमचे अंदोलन सुरू असून अस्तरीकरणाचे काम करू नका इतकेच बोलल्यावरून पोलिसांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत. तसेच कि.मी. 114 व कि.मी. 150 मध्ये एकाचवेळी अस्तरीकरण करावे या मुद्यावर लोकप्रतिनिधींनी ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
दरम्यान, लोकप्रतिनिधी आपल्या मागण्यांचा विचार करीत नाहीत व पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी चिकमहुद सलग दोन दिवस तर आज बुधवारी महुद बुद्रूक, खिलारवाडी, गायगव्हाण येथील लाभधारक शेतकर्यांनी गावातील दैनंदिन व्यवहार पूर्ण बंद ठेऊन दिवसभर कडकडीत बंद पाळल्याने गावात शुकशुकाट होता. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सपोनि नंदकुमार खडकीकर व पोलीस कर्मचार्यांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता.