बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : भर चौकात महत्वाच्या ठिकाणी विद्युत रोहित्राला लागलेल्या आगीला विझविण्यासाठी बार्शी नगरपालिकेचे पाचारण केलेले वाहन ऐनवेळी कुचकामी ठरल्याने अत्यावश्यक सेवा कोणत्या प्रकारची आहे याचा प्रत्यय बार्शीकरांना आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री 7.30 च्या सुमारास बार्शी बस स्थानक व शहर पोलीस ठाण्याच्या मधोमकध असलेल्या चौकात असलेल्या विद्युत रोहित्रातून ठिणगी बाहेर आली व वायरने पेट घेतला. सदरच्या चौकात वाहतूक व्यवस्थेसाठी असलेल्या पोलिस कर्मचारी अभिजीत गाटे यांनी सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून समोर असलेल्या बार्शी पोलीस ठाण्यातून अग्नीशमन विभागाकडे दूरध्वनी करुन कळिवले तसेच वेळ न दवडता पोस्ट चौकात असलेल्या विद्युत विभागाकडे स्वत: जाऊन कर्मचार्यांना विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगीतले. घटनेनंतर 10 मिनीटांनी बार्शी नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाचे वाहन क्रमांक एम.डब्ल्यू.सी.5410 हे घटनास्थळी आल्यानंतर पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला परंतु वाहनातील त्रुटीमुळे पाणी बाहेर येऊ शकले नाही. सगळीकडे अंधार तसेच आग ओकणारा विद्युत रोहित्रत्यात अत्यावश्यक सेवेचा उडालेला बोजवारा यामुळे जवळ गोळा झालेल्या नागरिकांनी बार्शी नगरपालिकेच्या नावाने ठणठणाट सुरु केला. घटना समजताच पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावाले यांनी स्वत: येऊन नागरिकांचा व बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण आणले व तात्काळ दुसर्या वाहनाला बोलाविण्यास सांगीतले. बार्शी नगरपरिषदेचे दुसरे वाहन क्रमांक एम.एच.13.सी.206 हे घटनास्थळी आल्यानंतर आग आटोक्यात आली.
शेजारी छोट्या टपर्यांची लाईन असल्याने आणखी वेळ गेला असता तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असती. कुचकामी यंत्रणेवर वेळोवेळी लक्ष न दिल्यानंतर काय होईल हे सदरच्या घटनेतून बार्शी नगरपरिषदेने शिकण्यासारखे आहे.