बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : तांत्रिक अभ्यासक्रमाचा जादा ताण तसेच प्रत्येक विषयाचे 2 भाग, प्रात्यक्षिकांच्या धड्यांची घटलेली संख्या, नवीन अभ्यासाचा अनावश्यक बोझा यामुळे खचलेल्या विद्यार्थ्‍यांनी भौतिकशास्‍त्र विषयाचा पेपर सुटल्यावर अनेक विद्यार्थ्‍यांना रडू कोसळले.
    चालू वर्षात विद्यार्थ्‍यांना देण्यात आलेली पुस्तके उशीराने मिळाली, मंडळाच्या आराखड्याप्रमाणे प्रश्नपत्रिकांचे स्वरुप नसल्याचे अनेक विद्यार्थ्‍यांनी म्हटले तर काही शिक्षकांनाच अभ्यासक्रमक समजला नसल्याने त्यांना विद्यार्थ्‍यांना शिकविता आले नाही. यामुळे काही विद्यार्थ्‍यांनी खाजगी शिकवणी लावूनही त्यातून कसलाही फायदा झाला नाही.
    काही विद्यार्थ्‍यांनी खाजगी शिकवणीमध्ये महत्वाच्या सांगीतलेल्या प्रश्नांची खास तयारी केल्याने त्यांना ते प्रश्न परीक्षेत नसल्याने विनाकारण झालेल्या गाढव श्रमाचा राग आला. कोणत्या स्वरुपात परीक्षा घेण्यात येणार याची कसलीही पूर्वतयारी न करता डायरेक्ट परीक्षेत नवीन पध्दतीचा भाग एक व दोनचा एकत्र पेपर घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेतील बोर्डाच्या चुकीमुळे 7 मार्क वाढिवण्याची नामुष्की ओढवलेल्या बोर्डाला आता भौतिक शास्‍त्र विषयाच्या विद्यार्थ्‍यांचा प्रश्‍न समोर आला आहे. सामान्य विद्यार्थ्‍यांना पेपर समजण्याइतपतदेखील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप नाही यामुळे खचलेल्या विद्यार्थ्‍यांवर परिणाम होत आहे. सदरच्या बाबत पूर्वीप्रमाणे दोन विभागाच्या परीक्षा घ्याव्यात, अथवा प्रत्येकाला 20 गुण देऊन पास करावे अन्यथा पालक व विद्यार्थी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे पालकांनी सांगीतले.
     याबाबत भौतिकशास्‍त्र विषयाच्या शिक्षकांशी संवाद साधला असता, त्यांनी यापूर्वी 40 गुणांचे दोन पेपर प्रत्येकी 2 तासांचे होते व दुसर्‍या पेपरमध्ये एक दिवसाचा अभ्यासासाठी कालावधी मिळत सध्याच्या पध्दतीमध्ये 7 गुणांचा एकच पेपर असून 4 ऐवजी 3 तासांचा पेपर आहे. सदरच्या अभ्यासक्रमात 21 धडे आहेत. ज्या मुलांना शाळेत अभ्यासात लक्ष नाही त्या मुलांना नीटपणे परीक्षेत लक्ष लागत नव्हते एक तासानंतर नुसते शांत बसून होते. नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तके वेळेवर उपलब्ध होती. पुस्तकांच्या बाहेरचे प्रश्न नाहीत. ज्यांनी नीट अभ्यास केला त्यांनी 6 ते 7 पुरवण्या जोडून प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत. नव्याने राबविलेल्या सी.बी.एस्सी. पॅटर्नला आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या पध्दतीने सामोरे जात नाहीत त्याला त्या प्रमाणात सुविधा नसल्याचेही कारण असू शकते. या अगोदर गणित व रसायन विषयांचा अभ्यासक्रम वेळेत न झाल्याने त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ज्या विद्याथ्र्यांना नीट लक्ष देऊन अभ्यास करायचा नाही त्यांना आईनस्टाईनदेखिल शिकवू शकणार नाही.
 
Top