मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे बृहन्मुंबईतील अधिस्विकृतीधारक पत्रकारांना देण्यात येणा-या मोफत प्रवास सवलत म्हणजेच प्लॅस्टीक स्मार्ट कार्डचे वितरण आज परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर उपस्थित होते.
गतवर्षी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पासचे वाटप करताना देवकर यांनी सुलभ असे स्मार्ट कार्ड देण्याचे आश्वासन दिले होते. आज त्याची पूर्तता होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री. देवकर म्हणाले, हे स्मार्ट कार्ड हाताळण्यास सुलभ, टिकाऊ व अतिशय सुबक आहे. या कार्डमुळे पत्रकारांनी किती प्रवास केला याची नोंद राहणार असल्यामुळे शासनाला तेवढेच पैसे महामंडळाला द्यावे लागतील. शिवनेरी आणि वातानुकूलित बसेसमधून प्रवास करण्याची सवलत मिळावी, या पत्रकारांच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन धोरण ठरविण्यात येईल, असे आश्वासनही देवकर यांनी यावेळी दिले.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी परिवहन राज्यमंत्री यांनी गेल्यावर्षी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता आली आणि आज त्यांच्याच हस्ते स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. याबद्दल आनंद व्यक्त केला. एस. टी. महामंडळाला चांगल्या सेवेसाठी दोन गोल्ड शिल्ड मिळाल्या असल्याचे नमूद करुन महाराष्ट्राची लाइफ लाईन असलेल्या एस. टी. ला पत्रकारांनी यापुढेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा कपूर यांनी यावेळी व्यक्त केली.
पत्रकारांना देण्यात आलेल्या सोयीच्या स्मार्ट कार्डबद्दल शासनाचे आणि महामंडळाचे आभार मानून मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांनी पत्रकारांना शिवनेरी आणि वातानुकूलित बसेसमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली. वार्ताहर संघाचे कार्यवाह मंदार पारकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.