सोलापूर : आंतर युवा मंडळ क्रीडा स्पर्धेंतर्गत दक्षिण-उत्तर तालुका क्रिकेट स्पर्धा दि. २३ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत पार्क मैदान सोलापूरयेथे आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेचे उदघाटन दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वा. आमदार दिलीप माने व पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रणजितसिंह मोहिते पाटील, महापालिका आयुक्त अजय सावरीकर उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा सोलापूर जिल्हा वेटरन्स स्पोर्टस असोसिएशन च्या सहकार्याने होत असून प्रथम, द्वितीय विजेत्यास अनुक्रमे रु २५०००/- रु. ११०००/- चे पारितोषिक व सहकारतपस्वी स्व. ब्रम्हदेवदादा माने स्मृती चषक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात येत आहेत याशिवाय दक्षिण व उत्तर तालुक्यातील प्रथम तीन संघांना प्रोत्साहनपर पारितोषिके नेहरु युवा केंद्रामार्फत देण्यात येत आहेत.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ग्रामीण युवा मंडळ- संस्थेकडून विहित रहिवाशी प्रमाणपत्रासह व प्रवेश शुल्क रु. २००/- यासह प्रवेशिका दिनांक २० फेब्रुवारी पर्यंत जयंत दळवी मो.क्र. ८८८८७९०००७ जे.डी. स्पोर्टस पार्क चौक, सोलापूर यांच्याकडे सायंकाळी ५ ते ८ यावेळेत स्विकारण्यात येणार असून को-या प्रवेशिकांचा नमुनाही त्यांच्याकडून वरील वेळेत उपछलब्ध करुन घेता येईल. स्पर्धेसाठी प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश या धर्तीवर प्रती तालुका दहा पात्र संघास प्रवेश देण्यात येणार असून सहभागी संघांना बॅट व बॉल वगळता इतर सर्व क्रीडा साहित्य स्पर्धेदरम्यान आयोजनकामार्फत पुरविण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र ग्रामीण युवक मंडळांनी - संस्थांनी त्वरीत संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे.