सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रब्बी ९६१ गावांची हंगामी पैसेवारी ५० पेसे व त्यापेक्षा कमी असल्याने आवश्यक त्याठिकाणी चारा टंचाईवरील उपाययोजना म्हणून जनावरांच्या छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत.
            सोलापूर जिल्ह्यातील चारा - कडबा दुस-या जिल्ह्यामध्ये अथवा लगतच्या राज्यामध्ये जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही व तशी वाहतुक झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण होईल. जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी दि. ८ फेब्रुवारी पासून ते दि. ३० जून पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील चारा दुस-या जिल्ह्यामध्ये अथवा लगतच्या राज्यामध्ये वाहतुक करण्यास या आदेशान्वये बंदी घातली आहे.
     चारा वाहतुक करण्यास केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांचे नियंत्रण असणारी संस्था, जनावरांचा चारा इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यासाठी मागणीनुसार रीतसर परवाना दि. महाराष्ट्र कॅटल फॉडर (ट्रान्फपोर्ट कंट्रोल) ऑर्डरच्या परिशिष्ट (२) मधील नमुन्यामध्ये देण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रापुरते प्रदान करण्यात येत आहेत त्यांनी वाहतुकीचा उद्देश तपासून उचित कार्यरवाही करावी. इतर जिल्ह्यामधून अथवा राज्यामधून या जिल्ह्यामध्ये येणा-या चारा वाहतुकीस सुट देण्यात आली आहे.
 
Top