येणेगूर -: सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर (ता. उमरगा) शिवारात गुरुवार रोजी गॅसचा टँकर व भरधाव ट्रक यांच्यात जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती.
अब्दुला युसुफ शहा (वय ५३, रा. नवी मुंबई, वाशी) असे अपघातात मरण पावलेल्या टँकर चालकाचे नाव आहे. तर ट्रकचालक मस्तान ऊडबाल (वय २५), क्लिनर अस्कल महमदअली ऊडबाल (दोघे रा. कप्परगाव, हुमनाबाद) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. यातील हैदराबादहून गुजरातकडे जाणा-या रिकाम्या गॅस टँकर (केए २१, ए ६५५९) ला नाशिकहून हैदराबादकडे भरधाव वेगाने जाणा-या ट्रक (एपी २८ यू. ०९७८) च्या चालकाने निष्काळजीपणाने ट्रक चालवून टँकरला समोरुन जोराने धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहने आडवी झाली होती. टँकर आडवे झाल्याने टँकर चालक अब्दुल्ला शहा हा टँकरखाली अडकला. त्याचे पत्र्यामध्ये दोन्ही पाय अडकल्याने बाहेर काढण्यास तब्बल दीड तासाचा कालावधी लागला. या चालकाचा येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केद्रात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. जखमींना प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी उमरगा येथे पाठविण्यात आले.