सांगोला (राजेंद्र यादव) : सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी दै. लोकमतचे तालुका प्रतिनिधी अरुण बोत्रे यांची निवड झाल्याबद्दल सांगोला तालुका पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शुक्रवारी सायंकाळी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत हा सत्कार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार राजेंद्र यादव होते. यावेळी विश्वजित नरळे, भारत कदम, उत्तम चौगुले, जगदीश कुलकर्णी, चंद्रकांत ऐवळे आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत आमदार गणपतराव देशमुख यांनी अरुण बोत्रे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा ठराव भारत कदम यांनी मांडला त्यास सर्वांनी मान्यता देवून तशा आशयाचे पत्र आमदार गणपतराव देशमुख यांना देण्याचे ठरले. नगरसेवक अरुण बोत्रे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, ''नगरसेवकपदाची संधी आपणास मिळाली असून सर्वांच्या सहकार्याने जास्तीत जास्त काम करुन आपली कारकिर्द यशस्वी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.''
संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक राजेंद्र यादव यांनी केले. तर आभार जगदीश कुलकर्णी यांनी मानले.