नळदुर्ग -: माघी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारक-यांच्या दिंडीत कार घुसल्याने सहा वारकरी भाविक ठार झाले तर सतरा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजता मुळेगाव पाटीजवळ चाकोते पंपासमोर घडली. या भिषण अपघातातील मयत चौघे वारकरी सिंदगाव (ता. तुळजापूर) येथील तर एक वागदरी (ता. तुळजापूर) व एक शहापूर (ता. तुळजापूर) येथील रहिवाशी आहेत. ही घटना सकाळी समजताच वरील गावासह तुळजापूर तालुक्यावर शोककळा पसरली.
देविदास दत्तात्रय बणजगोळे (वय ४७), जयश्री देविदास बणजगोळे (वय ४२), उध्दव काशिनाथ पाटील (वय ३५), श्रीधर श्रीपतराव ताडकर (वय ३०) (सर्व रा. सिंदगाव, ता.तुळजापूर), सोनाबाई ऊर्फ कुसुम गोविंद गुरव (वय ५०, रा. वागदरी, ता.तुळजापूर), लोचना रणशुर जाधव (वय ४२, रा. शहापूर, ता. तुळजापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांचे नावे आहेत. तर इंदुबाई मल्लिनाथ चिंचोले, सिंधुबाई मधुकर ताडकर, विद्या मारुती बिराजदार, सुशिला अंबदास बणजगोळे, राजश्री रमेश परशेट्टी (सर्व रा. सिंदगाव, ता. तुळजापूर), लक्ष्मी सुर्यकांत रेड्डी (रा. नळदुर्ग), सुशिला मोरे (रा. शहापूर, ता.तुळजापूर), रूक्मीण गोविंद पाटील, नागिनी पंडीत पाटील (दोघे रा. वागदरी, ता. तुळजापूर) यासह सतरा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितले. तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथून गुरुवार दि. १४ फेब्रुवारी रोजी माघी वारी साठी पंढरपूरकडे सकाळी सात वाजता ही दिंडी रवाना झाली. या दिंडीत वागदरी व शहापूर येथून प्रत्येकी एक महिला भाविक सहभागी झाल्या होत्या. ही दिंडी राष्ट्रीय महामार्गाने सोलापूरकडे जात असताना वाटेत ही विश्रांतीसाठी शुक्रवार रोजी रात्री थांबली होती. त्यानंतर पहाटे चार वाजता ही दिंडी पंढरपूरकडे प्रयाण करीत असताना पाठीमागून हैद्राबादहून सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणारी कार (क्रमांक एमएच ०४ डीआर १०४३) दिंडीत घुसली. यावेळी बेसावध असलेल्या दिंडीतील भाविकांच्या अंगावरुन गाडी गेल्याने तीन वारकरी जागीच ठार झाले. तर दोघांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सतरा वारक-यांना सोलापूरातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
ही घटना समजताच उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील चव्हाण यासह विविध संघटनेचे कार्यकर्ते, जळकोट, सिंदगाव, वागदरी, शहापूर व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी भेट देली. दरम्यान सिंदगाव येथे चौघा भाविकांच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. तर वागदरी येथे दुपारी तीन वाजता सोनाबाई गुरव यांच्या पार्थिवावर तर शहापूर येथे लोचनाबाई जाधव यांच्या पार्थिवावर नातेवाईक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. वागदरी येथील जिल्हा परिषद शाळेत सर्वच मयत भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मोकाशे, शालेय व्यवस्थापक समितीचे एस.के. गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.