सोलापूर -: शासकीय सेवेत कार्यरत असणा-या अधिकारी, कर्मचा-यांना सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे अपलब्ध करुन देण्याबाबत शासनाच्या सामजिक न्याय व विशेषसहाय्य विभाग यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. ब-याच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी याचा लाभ घेतलेला आहे. काही विभागाकडून उपकरणे उपलब्ध करुन देण्याची कारवाई सुरु आहे.
अनेक अधिकारी, कर्मचारी सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे घेणे नाकारत आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असणारे अपंग अधिकारी व कर्मचा-यांनी त्यांना आवश्यक असलेली सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणांची मागणी आपण कार्यरत असलेल्या आस्थापनेच्या विभाग प्रमुखांकडे करावी.
सदर शासनाच्या योजनेपासून एकही अधिकारी कर्मचारी वंचित राहणार नाही याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. विभाग प्रमुखांनीही आपले अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत समुपदेश करुन साधने घेण्यासाठी उद्युक्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.