सोलापूर -: दुष्काळी परिस्थितीमध्ये उजनीतुन पाणी सोडणे अवघड असुन सोलापूरला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.
कर्नाटक राज्यातुन सोलापूर जिल्ह्याला अलमट्टी धरणातुन पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्री प्रा. ढोबळे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा सचिव एकनाथ पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बिराजदार, सोलापूरचे अधिक्षक अभियंता दाभाडे उपस्थित होते.
सोलापूरसह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर इ. शहरे व अनेक गावांचा पाणी पुरवठा औज व हीळ्ळी बंधा-यावर अवलंबुन आहे. त्यामुळे इंडी ब्रँच कॅनॉलमधुन १.२ टीएमसी पाणी १ मार्च व १ मे अशा दोन टप्प्यात अलमट्टीतून भिमा नदीत सोडण्याची मागणी पालकमंत्री प्रा. ढोबळे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतांना केली. महाराष्ट्राला मानवतेच्या दृष्टीकोनातून अलमट्टी धरणातुन पाणी सोडण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिले.
महाराष्ट्राने कर्नाटकला वेळोवेळी टंचाईच्या काळात कृष्णा नदीत पाणी सोडुन मदत केली आहे. त्यामुळे आता अडचणीच्या काळात कर्नाटक सरकारद्वारे महाराष्ट्राला नक्की मदत केल्या जाईल. तसेच अलमट्टीच्या पाण्याबाबत चर्चा करुन तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही कर्नाटकचे जलसंपदामंत्री बसवराज बोमई यांनी बैठकी दरम्यान दिली.
याबाबत कर्नाटकच्या अधिका-यांचे एक दल मुख्य अभियंता, पुणे यांच्याशी तांत्रिक बाबीवर बोलणी करण्यासाठी पुढील आठवड्यात पाठविण्यात येईल असेही ते म्हणाले.