सांगोला (राजेंद्र यादव) : माघवारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकर्यांच्या दिंडीला समोरून येणार्या अज्ञात जीपने धडक दिल्याने दिंडीतील एकजण ठार झाला तर सातजण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास सांगोला मिरज रस्त्यावर जुनोनी गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ घडली. मयत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एकोंडी गावचा आहे.
आनंदा बाबू परीट (वय ६०, रा. एकोंडी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मरण पावलेल्या भाविकाचे नाव आहे. दत्तात्रय भाऊसाहेब सामुसे (वय ६०), विशाल हनुमंत चौगुले (वय १६), तानाजी पोपट मरतुकडे (वय २२). रणजित हिंदूराव चौगुले (वय १५), सुजित सुभाष सातुसे (वय १५) पंडीत बापू कांबळे (वय ६२), भाऊ बजरंग जाधव (वय ६५) (सर्व रा.साके ता. कागल जि. कोल्हापूर) असे जखमी झालेल्यांचे नावे आहेत. कागल तालुक्यातील साकी गावचे वारकरी माघी वारीकरीता पंढरपूरला निघाले असताना, सांगोला मिरज रोडवर जुनोनी गावाजवळ शनिवारी सकाळी पावणेसहाच्या दरम्यान भरधाव वेगाने येणार्या एका अज्ञात जीपने जोराची धडक दिल्याने आठजण जखमी झाले. या सर्वांना सांगोला येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यातील आनंदा परीट यांचा मृत्यू झाला. उर्वरीत सर्वांवर उपचार करुन त्यांना मिरजला हलविण्यात आले. या सर्वांना हातापायाला गंभीर इजा झाल्या आहेत. सदर अपघात घडल्यानंतर जीपचालक न थांबता तसाच सुसाट वेगाने मिरजच्या दिशेने पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक दयानंद गावडे व सहाय्यक पोलीस निरिक्षक सातप्पा नाईक, पो.कॉ. संजय जाधव, अशोक बाबर, दत्तात्रय तोंडले, अभिमान बुटाळ, मधुकर कर्चे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आणि जखमींना तातडीने उपचारासाठी सांगोल्याला हलविले.
पोलीस निरिक्षक गावडे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून या दिंडीतील इतर वारकर्यांना धीर व दिलासा दिला. तसेच तातडीने उपाययोजना करुन त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली. पोलीसांकडे माणूसकी व सामाजिक बांधिलकी त्यांनी यावेळी दाखविल्यामुळे दिंडीतील वारकर्यांनी त्यांना धन्यवाद दिले.