मुंबई :- राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस अल्प प्रमाणात झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील दुष्काळी भागात प्रभावी उपाययोजना करता याव्यात, यासाठी मदत म्हणून राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी आज आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे.

संगीता अहिर यांचीही दुष्काळग्रस्तांसाठी मदत

      गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या पत्नी संगीता अहिर यांनीही श्री संकल्प प्रतिष्ठान, वरळी यांच्यातर्फे ५१ हजार रुपयांचा धनादेश दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे.
 
Top