मुंबई : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशास महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा)अध्यादेश, २०१३ असे संबोधण्यात येईल. हा अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या १४ फेब्रुवारी २०१३ च्या असाधारण राजपत्र भाग-८ मध्ये प्रकाशित करण्यात आला असून तो तात्काळ अंमलात आला आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्राधिकरणाच्या स्थापनेबरोबरच अनेक नव्या तरतुदींचा या अध्यादेशात समावेश करण्यात आला आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्राधिकरणाच्या स्थापनेबरोबरच अनेक नव्या तरतुदींचा या अध्यादेशात समावेश करण्यात आला आहे.