मुंबई :- राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात २० व २१ फेब्रुवारी, २०१३ रोजी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. या लाक्षणिक संपात सहभागी होणा-या अधिकारी, कर्मचा-यांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
       राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी हा संप मागे घ्यावा व या संपात कोणत्याही अधिकारी व कर्मचा-यांनी सहभागी न होता तसेच शासकीय काम न थांबविता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहनही शासनाने केले आहे.
      संपात सहभाग घेऊन शासकीय काम बंद ठेवणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही शासनाने सूचित केले आहे.
 
Top