कळंब -: बनावट दस्‍तऐवज तयार करुन वंशपरंपरागत जमीन परस्पर इतरांच्या नावे केल्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार सह तलाठी व इतर दोघांविरुद्ध कळंब पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील कोठाळवाडी येथे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.
         येथील अश्‍वीनी सुधाकर कोठावळे (रा. कोठाळवाडी, ता. कळंब ) यांनी पोलीसात दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे की, माणिक गोवर्धन कोठावळे व बिभीषण गोवर्धन कोठावळे यांच्या वडिलांच्या नावे कोठाळवाडी शिवारात जमीन होती. सदर जमीन या दोघांनी तत्कालीन नायब तहसीलदार आर. पी. बोरसुरे व तलाठी बी. एस. कसबे यांच्याशी संगनमत करुन स्वत:च्या नावे करुन घेतली. नायब तहसीलदार व तलाठय़ांच्या सहाय्यानेने बनावट कागदपत्रे तयार केली. यामध्ये वारस असलेल्या अश्‍विनी कोठावळे यांना कसलाही हिस्सा न देता परस्पर बनावट व बेकायदेशीर कागदपत्रे तयार करुन जमीन नावावर करुन घेत फसवणूक केल्याची फिर्याद अश्‍विनी कोठावळे यांनी दिली आहे. त्यावरुन नायब तहसीलदार बोरसुरे, तलाठी कसबे, मणिक कोठावळे व बिभीषण कोठावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार गोलेकर हे करीत आहेत.
 
Top