मुंबई :- शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २०१२-१३ या वर्षासाठी प्रथमच भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीचा पुरस्कार गानसरस्वती किशोरी अमोणकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
    भारतीय शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतास हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार असून ५ लाख रुपये रोख, मानपत्र व स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
     सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखालील राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य व संचालक तसेच पं. प्रभाकर कारेकर, पं. सुरेश तळवलकर, पं. उल्हास बापट, शशि व्यास, अमरेंद्र धनेश्वर यांच्या निवड समितीने श्रीमती किशोरी अमोणकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
 
Top