सोलापूर -: सुवर्ण जयंती स्वरोजगार योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता बचत गट सदस्य, जिल्हा व तालुकास्तरीय अधिका-यांसाठी संवेदना जागृती कार्यशाळा तसेच तालुकास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण उद्या रविवार दि. 24 फेब्रुवारी रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे होणार आहे.
यावेळी बचत गटाने उत्पादीत केलेल्या वस्तुंची विक्री व प्रदर्शन स्टॉलचे प्रदर्शन दिनांक 21 ते 24 या कालावधीत होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 वाजल्यापासून सुरु राहणार आहे. तसेच या पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हयातील हजारो महिला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.