उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी/मार्च- 2013 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा कालावधीत विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांच्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता 10 वी साठी 02382-251733 आणि 12 वी साठी 02382-251633 ही हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली  आहे. तरी विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडी-अडचणी विषयी उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.
 
Top