उस्मानाबाद :- जिल्हयातील माजी सैनिक सेवानिवृत्त होवून आल्यानंतर त्यांना केंद्र सरकार / राज्य सरकार यामध्ये पुनर्नियुक्त होवून सेवानिवृत्त झाल्यास सैन्य सेवा निवृत्तीवेतन व केंद्र किंवा राज्य सरकार यांचेपण सेवानिवृत्तीवेतन मिळते. परंतू माजी सैनिकांचे विधवा पत्नीस माजी सैनिक मृत्यु पावल्यास सैन्यातील फॅमिली पेंशन किेवा पुर्ननियुक्ती झालेल्या केंद्र/ राज्य सरकारची फॅमिली पेंशन या दोहोंपैकी एकच मिळत होती. दिनांक 24 सप्टेंबर 2012 पासून मयत माजी सैनिकाचे विधवास दोन्ही फॅमिली पेंशन लागू झालेल्या आहेत,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे. 
       तरी ज्या माजी सैनिकाचे विधवानी पुर्ननियुक्त केंद्र/ राज्य सरकारची फॅमिली पेंशनसाठी विकल्प दिलेला असेल, त्यानी सैन्य सेवेची फॅमिली पेंशन मिळणेकरिता अर्ज करावा. तसेच ज्या माजी सैनिकाचे विधवानी सैन्यसेवेच्या पेंशनसाठी विकल्प दिलेला असेल, त्यानी पुर्ननियुक्त झालेल्या केंद्र /राज्य सरकारमधील सेवा केलेल्या विभागात पेंशन मिळणेकरिता अर्ज करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

माजी सैनिकांना 6 व्या वेतन आयोग पेन्शनबाबत सूचना
उस्मानाबाद :- जिल्हयातील सर्व निवृत्तीवेतनधारक माजी सैनिक दरमहा बँकेतून निवृतीवेतन घेत आहेत. त्यांचे सहाव्या वेतन आयोगानुसार 01 जानेवारी 2006 पासून सुधारीत वेतन करण्यात आले आहे. तसेच त्यानंतर पी. सी. डी. ए. पेंशन, अलाहाबाद यांचे दिनांक 10 मार्च 2010 नुसार व 01 जुलै 2009 पासून दिनांक 24 सप्टेंबर 2012 पासून सुधारीत करण्यात आले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
        तरी माजी सैनिक/विधवांना 6 वे वेतन आयोगानुसार वेळोवेळी वाढ करण्यात आलेली पेंशन त्यंना योग्य मिळत आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याकरिता सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे पेंशन सेलची स्थापना करण्यात आलेली आहे. तरी जिल्हयातील सर्व पेंशनधारक माजी सैनिक/विधवा यांची पेंशनबाबतची माहिती फॉर्म स्वरुपात सदरील पेंशन सेलला पाठवावयाची आहे. सदरची माहिती पुरविण्यासाठी या कार्यालयात फॉर्मस उपलब्ध आहेत तसेच तालुक्याच्या ठिकाणी माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयात फॉर्मस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
        तरी जिल्हयातील सर्व पेंशनधारक माजी सैनिक/विधवा यांनी त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या माजी संघटनेच्या कार्यालयात जावून त्यांनी नेमलेल्या माजी सैनिकाकडून फॉर्म घेवून भरुन द्यावा. फॉर्मसोबत डिसचार्जबुक, ओळखपत्र, पी.पी.ओ, बँकेचे पासबुक आणि ई. सी. एच. एस. कार्डाची छायाकिंत प्रत जोडण्यात यावी. माजी सैनिक/विधवा यानी फॉर्म भरुन संघटनेच्या कार्यालयाकडे लवकरात लवकर सादर करावेत.
 
Top