उस्मानाबाद :- पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 24 फेब्रुवारी रोजी राबविण्यात येत असून यामध्ये  0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. जिल्हयात शहरी विभागात 148 लसीकरण बुध केंद्राची सोय करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या बाळास नजीकच्या लसीकरण केंदा्रवर जावुन पोलोओ डोस पाजून घ्यावे, असे आवाहन डॉ. अशोक धाकतोडे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    पोलीओ डोस पाजण्यासाठी उस्मानाबाद येथे 45,तुळजापूर-21, उमरगा-19, नळदुर्ग-16, मुरुम-15, कळंब-16, भूम-8, परंडा-8 याप्रमाणे लसीकरण बूध केंद्राची सोय करण्यात आली असून याशिवाय बसस्थानक, बाजार, बांधकामे, टमटम, स्टॅड, आदि ठिकाणी ट्रान्झीट टिमची विशेष सोय करण्यात आली आहे
 
Top