सोलापूर -: यंदा दुष्काळाची टंचाई जाणवत असून सध्या उजनी धरणात उपलब्ध असणा-या पाण्याचे योग्य नियोजन करुन हे पाणी माणसांना व जनावरांना उपलब्ध व्हावे तसेच जूलै अखेर पर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येईल. अशी ग्वाही विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात विभागीय आयुक्त श्री. देशमुख यांनी सोलापूर जिल्हा टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, महापौर अलका राठोड, जि.प. अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, मनपा आयुक्त अजय सावरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण उपस्थित होते.
विभागीय आयुक्त देशमुख म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती जाणवत असून याप्रसंगी शासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करुन या दुष्काळाचा सामना करावा. तसेच या जिल्हयाने ई- मस्टरची संकल्पना राबवावी. त्याचबरोबर चारा छावणी संदर्भात तहसिलदारांनी संबधीत पशुपालकांसमवेत दर आठवडयाला बैठक घेऊन अडचणीचा निपटारा करावा. जिल्हयातील सिमेंट बंधारे, नाला-बंल्डींग दुरुस्तीची कामे संबधीत विभागाने प्राधान्याने दुरुस्त करुन घ्यावीत. यंदा किमान 2200 बंधारे जिल्हयात व्हावेत यासाठी अधिका-यांनी नियोजन करावे असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
महात्मा फुले मृद व जलसंधारण अभियानांतर्गत गावांमध्ये मूलस्थानी जलसंधारण ही संकल्पना मोहिमेद्वारे प्रत्यक्ष स्वरुपात उतरवा. यासाठी कृषि विभागाच्या अधिकारी - कर्मचा-याना प्रशिक्षण देऊन जनजागृती करा, जेणेकरुन बंधा-यांमध्ये पाणी अडवून त्याची साठवण करणे सोपे जाईल व जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील. यासाठी सर्व प्रकारच्या बंधा-यांच्या किरकोळ असलेल्या दुरुस्त्या करुन गाळ काढण्यास प्राधान्य द्या. तसेच टंचाई परिस्थितीमध्ये अधिका-यांनी राज घेऊ नये. अशी सुचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी केली.
नवीन सिमेंट बंधारे बांधणी व दुरुस्ती, उजनीतील पाणीसाठा, सध्या सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजना, रोहयो योजना, चारा टंचाई, आदींचा आढावा यावेळी विभागीय आयुक्तांनी घेतला. टँकर चालकाकडून संबधीतांनी आठ दिवसांत बिले घ्यावी. तसेच गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कनिष्ट अभियंता व संबधीत अधिका-यांनी पाणी टंचाई असणा-या गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावी. अशी सुचना जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केली. तर सोलापूर शहरासाठी आणखीन तीस विंधन विहिरिंची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आयुक्त सावरीकर यांनी केले. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे संबधीत पदाधिकारी उपस्थित होते.