उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत भारत अभियान कक्षाच्यावतीने ग्रामीण भागातील घरांची व परिसरांची स्वच्छता व्हावी व सर्वसामान्य जनतेचे आरोग्यमान उंचाविण्यसाठी गावात निर्मल दुतांची निवड करुन त्यांच्यामार्फत ग्रामीण भागातील कुटुंबाना वैयक्तिक शोचालय बांधकाम व त्याचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे. निर्मल भारत अभियान गावात प्रभावीपणे राबवून गाव निर्मलमय करावे, असे आवाहन  एस.एल. हरिदास, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद  यांनी केले आहे.     
     जिल्हा पुर्णपणे निर्मलमय करण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद कार्यक्रमात आंतरव्यक्ती संवादावर अधिकभर देण्यात येणार असून निर्मल भारत अभियानात निवडलेल्या गावात भारत निर्माण स्वयंसेवक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी,ग्राम आरोग्यसेवक,सेविका, दाई, शाळेतील शिक्षक, गावपातळीवरील इतर शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पंच, स्यंसहायता गटाचे सदस्य, विविध ग्रामविकास समितीचे सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व इतर क्षेत्रिय कायकर्ते यांच्यातून प्रवर्तकांची निवड करुन त्यांना निर्मल दुत असे नाव देण्यात येणार आहे.
     निर्मल दुत गावातील लोकांना शोचालयाचे महत्व पटवून शौचालय बांधकाम व त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करातील तसेच शौचालय बांधकाम खर्च, अनूदान, वैयक्तिक स्वच्छता, पाणीशुध्दीकरणाचे महत्व व सोप्या पध्दती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गटार, शेाषखडडे व देखभाल दुरुस्ती आदिची माहिती ग्रामस्थांना देतील. यासाठी निर्मल दूतांना गावातील शौचालय नसलेली कुटुंब निश्चित करुन दिल्यावर त्यांना शौचालय बांधून त्याचा वापर सुरु करण्यास प्रती कुटुंब रुपये 75 एवढा प्रोत्साहन भत्ता निर्मल दुतास मिळणार आहे. निर्मल दुताची निवड ग्रामसभेतून होणार असल्याने त्याच्या स्वत:च्या घरी शौचालय असणे बंधनकारक आहे. तसेच त्यांना प्रेरित करावयाच्या कुटुंबाची यादीही ग्रामसभेतून अंतीम होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
 
Top