सोलापूर : सफाई कर्मचा-यांच्या आरोग्यासाठी त्यांची नियिमत तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी दर तीन महिन्याला एकदा आरोग्य शिबीराचे आयोजन करुन त्यांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी अयोगाचे सदस्य श्यौराज जीवन यांनी दिल्या.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बालेत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी बोलतांना श्यौराज जीवन म्हणाले की, देशाचा खरा सेवक सफाई कर्मचारी आहे. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. जिल्ह्यातील नगरपालिकानिहाय लोकसंख्या व सफाई कर्मचा-यांची संख्या, सफाई कर्मचा-यांची रिक्त पदे आदिबाबत श्री. जीवन यांनी माहिती घेत रिक्त पदांची कारणे जाणून घेवून त्वरित भरण्याच्या सूचना दिल्या.
    तसेच सफाई कर्मचा-यांना नियमित वेतन दिले जाते की नाही. वेतन व्हेंडर मार्फत दिले जाते की कसे दिले जाते. त्यांच घरकुलांस्थितीबाबतची  माहिती घेतली. त्याच प्रमाणे सर्वेक्षण करुन त्यांना बीपीएल कार्ड देण्यात यावे. सफाईची उपकरणे देण्यात यावीत. या घटकातील विधवा, वृध्द, विकलांगासाठी शिबीरे घेवून त्यांना सहाय्य करण्यात यावेत अशा सूचनाही श्योराज जीवन यांनी बैठकीत दिल्या.
 
Top